शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

एसटीच्या एनसीएमसी कार्डसक्तीला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ, सरनाईक यांची माहिती

एसटीच्या एनसीएमसी कार्डसक्तीला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ, सरनाईक यांची माहिती
प्रताप सरनाईक | फाइल फोटो | Free Press Journal
नागरी PT24 टीम

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कार्ड नसतानाही ७ नोव्हेंबर २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत एसटीच्या प्रवास सवलती मिळतील.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीत प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देणारा निर्णय झाला आहे. एसटीच्या सवलतींसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

शासनाच्या निर्देशानुसार महामंडळ समाजातील वेगवेगळ्या घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सोय देते. या सवलतींचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावीपणे मिळावा, म्हणून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हे कार्ड १ ऑक्टोबर २०२६ पासून अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डांची नोंदणी आणि वाटप झाले आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थींची नोंदणी अजून अपूर्ण आहे. या योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे त्या अजूनही स्मार्ट कार्डविना आहेत, असे लक्षात आले आहे.

महिला लाभार्थींची मोठी संख्या आणि ग्रामीण भागात नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेतल्या गेल्या. तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्र्यांनी केलेल्या विनंत्यांचाही सकारात्मक विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यामुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड नसतानाही महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना उद्या, ७ नोव्हेंबर २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत एसटीच्या प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. ज्यांची कार्ड नोंदणी अजून झालेली नाही, त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळेल.

दरम्यान, महामंडळाने ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे घेण्याचे ठरवले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सक्रिय सहभागातून ही शिबिरे राबवली जाणार आहेत. या मोहिमेतून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व पात्र लाभार्थींची १०० टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी आणि वाटप पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.

मुदतवाढीच्या काळात सर्व पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदवून घ्यावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतींपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थीपर्यंत कार्ड पोहोचवण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ