भारताच्या 'गोल्डन गर्ल्स'; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; पंतप्रधान मोदींकडून खास शुभेच्छा
एशियन गेम्स 2026 मधील क्रिकेट फायनलमध्ये भारतीय महिला संघाने श्रीलंकेला 147 रन्सने हरवत गोल्ड मेडल जिंकले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन केले.
जपानमध्ये सध्या एशियन गेम्स 2026 ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील क्रिकेटच्या फायनलमध्ये आज भारत आणि श्रीलंका यांच्या महिला संघांची गाठ पडली. या सामन्यात भारतीय संघाने आधी फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर 217 रन्सचे टार्गेट ठेवले होते. एवढी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. त्यामुळे श्रीलंकेचा डाव अवघ्या 69 रन्समध्ये आटोपला आणि संपूर्ण संघ ऑल आउट झाला. या फायनलमध्ये भारताने तब्बल 147 रन्सने बाजी मारली आणि एशियन गेम्समधील सुवर्णपदकावर नाव कोरले.
एशियन गेम्स 2026 मधील भारताचे हे पहिलेच गोल्ड मेडल ठरले असल्याने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या कामगिरीला वेगळेच महत्त्व मिळाले आहे. सामन्यात आधी फलंदाजांनी मोठी धावसंख्या रचली आणि नंतर गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजांना धावांसाठी झगडायला लावले. भारतीय गोलंदाजांनी सामन्यात सातत्याने दबाव कायम ठेवला आणि श्रीलंकेच्या फलंदाजांना अवघ्या 69 रन्सवर ऑल आउट केले. एशियन गेम्ससारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय महिला संघाने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. फायनलमधील 147 धावांचे अंतर हे भारतीय संघाच्या वर्चस्वाचीच साक्ष देत आहे. या ऐतिहासिक विजयानंतर देशभरातून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सोशल मीडियावरही भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
भारतीय महिला संघाच्या या सुवर्ण कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संघाचे अभिनंदन केले. पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये संघाच्या शानदार विजयाचे कौतुक करण्यात आले. पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय क्रिकेटसाठी ही शानदार कामगिरी असून एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने मिळवलेले हे सुवर्णपदक केवळ एका सामन्यातील विजय नसून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला क्रिकेटची वाढती ताकद अधोरेखित करणारे यश असल्याचेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले.
पीएमओ इंडियाच्या अधिकृत एक्स हँडलवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारतीय क्रिकेटसाठी हा शानदार विजय आहे. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन. आत्मविश्वास, कौशल्य आणि उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर या स्पर्धेत संघाने दमदार खेळ केला. या विजयामुळे भारताला याही आधीचे यश मिळाले आहे, असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या या पोस्टनंतर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयाची चर्चा देशभरात सुरू झाली आहे.