आशियाई खेळ 2026: 1 ऑक्टोबरला सेमिफायनल, भारताची गाठ श्रीलंकेशी, पाकिस्तानसमोर बांगलादेश
आशियाई खेळ 2026 मधील क्रिकेट स्पर्धेत सेमिफायनलचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. दोन्ही सेमिफायनल सामने 1 ऑक्टोबरला खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानसमोर बांगलादेश असेल, तर दुसऱ्या सामन्यात भारताची गाठ श्रीलंकेशी पडेल. कोणता संघ कधी, कुठे आणि कोणासोबत खेळणार, हे आता ठरले आहे.
वेळापत्रकाप्रमाणे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातला पहिला सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता सुरू होईल. त्याच दिवशी भारत आणि श्रीलंका यांच्यातला दुसरा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चारही संघांनी आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. तरीही योगायोगाने ते सेमिफायनलमध्ये पोहोचले आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत पुढची फेरी फक्त सर्वोत्कृष्ट क्रमवारीच्या आधारावर ठरत गेली आहे.
हाँगकाँग, अफगाणिस्तान, मलेशिया आणि नेपाळ हे संघ गटफेरीचे आव्हान पार करून क्वॉर्टर फायनलमध्ये आले होते. पण पावसामुळे त्यांना सेमिफायनलमध्ये आपली दावेदारी मांडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. सीडिंग सिस्टमखाली थेट क्वॉर्टर फायनल खेळण्याचे तिकिट मिळालेले तेच चार संघ आता सेमिफायनलमध्ये आहेत.
आशियाई खेळांतील क्रिकेट स्पर्धा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. गटफेरीपासून आतापर्यंत अनेक सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. चारही क्वॉर्टर फायनल सामन्यांवरही पावसाने पाणी फेरले. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. क्वॉर्टर फायनल रद्द झाल्यावर सर्वोत्कृष्ट क्रमवारीच्या आधारे भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश सेमिफायनलला पोहोचले.
आशियाई खेळ 2022 मध्येही भारताला सर्वोत्कृष्ट क्रमवारीच्या आधारेच सुवर्ण पदक मिळाले होते. त्या वेळी फायनलमध्ये भारतीय पुरुष संघाचा सामना अफगाणिस्तानशी होणार होता, पण पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. म्हणून क्रमवारीच्या आधारे भारतीय संघाला चॅम्पियन घोषित करण्यात आले होते.
यंदा मात्र नियम बदलण्यात आले आहेत. यंदा जर फायनलचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना सुवर्ण पदक दिले जाईल.