मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:12 IST

HR मीटिंगसाठी गेला आणि बेपत्ता झाला; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा

दिल्लीतील ३१ वर्षीय एचआर व्यावसायिकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, माजी सहकारी आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

HR मीटिंगसाठी गेला आणि बेपत्ता झाला; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

दिल्लीत एका ३१ वर्षीय एचआर व्यावसायिकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव युवराज सिंग मनचंदा असे आहे. त्याची माजी सहकारी अन्या वत्स आणि तिचा साथीदार संयम सचदेवा यांनी मिळून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून, या हत्येमागे आर्थिक वादाचे कारण असल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी युवराज दिल्लीतील लाजपत नगर भागातील सेंट्रल मार्केटमध्ये बहिणीसोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेला होता. लग्नासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करत असताना त्याने बहिणीला सांगितले की, त्याला गुरुग्राममध्ये एक मीटिंग आहे. त्यासाठी तो तिथून निघाला आणि रात्री १० वाजेपर्यंत घरी परततो असेही त्याने बहिणीला सांगितले होते. मात्र ठरलेल्या वेळेत तो घरी परतलाच नाही. त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईलही बंद लागत होता. यामुळे घरच्यांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र पाच दिवस उलटूनही युवराजचा कुठलाही ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. सर्वप्रथम पोलिसांनी युवराजच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआर तपासला. ही सीडीआर तपासणी करत असताना युवराजने त्याची आधीची ऑफिस सहकारी अन्या वत्स हिच्याशी संपर्क साधल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हा धागा हाती लागताच पोलिसांनी अन्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तपासाची सुई तिच्याकडे वळली. पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान अन्या आणि संयम या दोघांचीही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान या दोघांनी युवराजच्या हत्येत आपला सहभाग असल्याची कबुली दिली, असा पोलिसांचा दावा आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, युवराज आणि दोन्ही आरोपींमध्ये आर्थिक व्यवहारावरून आधीपासूनच वाद सुरू होता. याच वादातून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. हत्येनंतर काही तास मृतदेह क्रेटा कारमध्ये ठेवण्यात आला होता आणि नंतर तो गुरुग्राममधील सेक्टर ७० परिसरातील गटारात टाकून देण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दोन्ही आरोपी उत्तराखंडला पळून गेल्याचा आरोप आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी उत्तराखंडमधून या दोघांनाही अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अजूनही सुरू असून, हत्येमागचे नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम याबाबत पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ