मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:13 IST

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई

पिंपरी परिसरात गणेशोत्सवातील सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे साऊंड सिस्टिम मोठ्या आवाजात वाजवून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलिसांनी दोन गणेश मंडळांवर कारवाई केली.

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

पिंपरी परिसरातील गणेशोत्सवातील सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे साऊंड सिस्टिम मोठ्या आवाजात वाजवून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलिसांनी दोन गणेश मंडळांवर कारवाई केली आहे. चांदखेड येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि ओझर्डे येथील शिवतेज मित्र मंडळ या दोन मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही मंडळांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान परवानगीपेक्षा जास्त आवाजात ध्वनीक्षेपक यंत्रणा वाजवल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. या कारवाईत पोलिसांनी डीजे साऊंड सिस्टिम, मिक्सर, ॲम्प्लीफायर आणि एक वाहन असा मुद्देमाल जप्त केला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव काळात सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आधीच ध्वनिप्रदूषणाबाबत खास सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार उच्च आवाजातील डीजे साऊंड सिस्टिम वापरू नये आणि सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शहरातील सर्व गणेश मंडळांना करण्यात आले होते. मात्र या आवाहनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी नंतर कारवाईचा बडगा उगारला.

शिरगाव-परंदवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी एकूण ३८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन पार पडले. या विसर्जन मिरवणुकीदरम्यान चांदखेड आणि ओझर्डे येथील मंडळांनी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात ध्वनीक्षेपक यंत्रणा वाजवल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मिरवणुकीवर लक्ष ठेवून असलेल्या पोलिसांनी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर लगेचच दोन्ही मंडळांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली.

शिरगाव-परंदवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी याबाबत सांगितले की, गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होताना आवाजाची मर्यादा आणि न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. उच्च आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांवर कोणतीही आधी सूचना न देता थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. तसेच गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करून ध्वनिप्रदूषण टाळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दुसरीकडे, पुण्याच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीला लागणारा तब्बल ३० ते ३२ तासांचा कालावधी कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन किंवा त्याहून अधिक वर्षांपासून मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनाच यंदा विशेष बाब म्हणून प्रवेश दिला जाणार आहे. मात्र पुढील वर्षापासून मंडळांच्या सहभागाबाबत कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ