मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:30 IST

देवळी तहसील कार्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

वर्धा जिल्ह्यातील देवळी तहसील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 157 वी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती साजरी झाली.

देवळी तहसील कार्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील तहसील कार्यालयात भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. दिनांक 2/10/2026 रोजी महात्मा गांधी यांच्या जन्माला 157 वर्षे पूर्ण झाली, तर लालबहादूर शास्त्री यांच्या जन्माला 122 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संपूर्ण भारतभर त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्याच निमित्ताने वर्धा जिल्ह्यातही हा कार्यक्रम झाला.

देवळी तहसील कार्यालयातील या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी प्रफुल्ल चौधरी आणि तहसीलदार समर्थ क्षिरसागर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

त्यानंतर नायब तहसीलदार राजेन्द्र सयाम आणि नायब तहसीलदार श्रीमती माया चावडीपांडे यांनीसुद्धा महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. अशा प्रकारे महात्मा गांधी यांची 157 वी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती देवळी तहसील कार्यालयात साजरी करण्यात आली.

या वेळी देवळी तहसील कार्यालयातील अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होता.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ