जळत्या चितेत अचानक भयंकर स्फोट, स्मशानभूमीतील थरारक Video Viral
स्मशानभूमीत चिता जळत असतानाच अचानक मोठा स्फोट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने या स्फोटात कोणालाही इजा झाली नाही.
सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर केले जातात आणि त्यातील अनेक व्हिडिओ बघणाऱ्यांना आश्चर्यचकित करतात. या प्लॅटफॉर्मवर रोजच्या रोज नवनवीन आणि धक्कादायक प्रकार बघायला मिळतात. सध्या असाच एक विचित्र आणि धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांना धक्का बसला आहे. या व्हिडिओत स्मशानभूमीतील एक दृष्य दाखवण्यात आले आहे.
व्हिडिओत सुरुवातीला एका शेडखाली चिता जळताना दिसते. चितेतून धुराचे लोट बाहेर पडत असतात आणि सगळं काही नेहमीसारखं सुरळीत सुरू असतं, जसं स्मशानभूमीत नेहमी घडतं. मात्र काही सेकंदांतच परिस्थिती एकदम बदलते आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना एक अनोखी घटना घडते. चिता जळत असतानाच तिथे अचानक एक मोठा स्फोट होतो आणि हे दृष्य पाहणाऱ्या सर्वांचेच डोळे विस्फारतात.
त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी हे संपूर्ण दृष्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले, आणि तोच व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या घटनेच्या वेळी सुदैवाने चितेजवळ कोणीही उभे नव्हते, त्यामुळे स्फोटात कुणालाही इजा झाली नाही, ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
ही घटना पाहता, चितेत झालेला हा स्फोट काही चमत्कार नसून यामागे शास्त्रीय कारणही असू शकते, असं सांगितलं जातं. तज्ज्ञांच्या मते, चिता रचताना मृतदेहाजवळ हवा किंवा वायू असलेली एखादी वस्तू ठेवली गेली तर प्रचंड उष्णतेमुळे तिचा स्फोट होऊ शकतो. तसेच बांबू किंवा लाकडामध्येही अनेकदा हवा अडकलेली असते, हे देखील तज्ज्ञ सांगतात. ज्वालांचे रूपांतर वाफेत होताना प्रचंड दाब तयार होतो, आणि त्यामुळेच असा स्फोट घडून येतो, असं स्पष्टीकरण दिलं जातं. याशिवाय चितेवर जास्त प्रमाणात तूप, कापूर किंवा अन्य ज्वलनशील पदार्थ टाकले गेले, तरी अचानक ज्वाला भडकून स्फोटासारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असेही तज्ज्ञ सांगतात.
हा व्हिडिओ @kati_kappari या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून अनेक युजर्सनी यावर कमेंट करत आपापली मते मांडली आहेत. एका युजरने लिहिले, "जाता जाता धमाका करुन गेला." दुसऱ्या युजरने कमेंट केली, "अरे बापरे असं घडताना मी पहिल्यांदाच पाहिलं." तर आणखी एका युजरने लिहिले, "अनेकांना वाटतंय की यामुळे कवटी फुटली असेल पण हा स्फोट चितेच्या मध्यभागी झाला."
या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे.