मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:23 IST

भक्तीची कमाल आणि अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवी काली मातेची मूर्ती ठेवून सायकल चालवला तरुण, व्हिडिओ व्हायरल

डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकल चालवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भक्तीची कमाल आणि अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवी काली मातेची मूर्ती ठेवून सायकल चालवला तरुण, व्हिडिओ व्हायरल
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

सोशल मीडियावर रोज कुठला ना कुठला व्हिडिओ चर्चेत येतो, कधी हसवणारा तर कधी थक्क करणारा. सोशल मीडियाच्या या जगात दररोज नवनवीन आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ शेअर केले जातात. हे व्हिडिओज कधी आपल्याला थक्क करतात, कधी आश्चर्याचा धक्का देतात तर कधी मनसोक्त हसवून जातात. जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घटना यामुळे पाहता येते आणि लोकांशी कनेक्टही होता येतं. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय, ज्यात एका तरुणाने आपल्या श्रद्धेचा आणि बॅलन्सचा अनोखा नमुना दाखवला आहे. असं म्हणतात की मनात श्रद्धा असेल तर व्यक्ती प्रत्येक गोष्ट साकार करुन दाखवू शकतो, आणि असाच एक पराक्रम या तरुणाने करुन दाखवला आहे.

या व्हिडिओत एक तरुण सायकल चालवत रस्त्यावरून आपल्या गंतव्यस्थानाकडे जाताना दिसतो. यात खास आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या डोक्यावर देवी काली मातेची मूर्ती ठेवलेली असते. सायकल चालवताना त्याने एक हात मूर्तीवर ठेवलेला असतो, तर दुसऱ्या हाताने तो सायकलचं हँडल सांभाळत पुढे जातो. संपूर्ण व्हिडिओभर त्याचा तोल अजिबात ढासळत नाही, तो सायकल आणि डोक्यावरची मूर्ती दोन्ही योग्यरित्या बॅलन्स करत पुढे जातो. व्हिडिओतील ही दृश्ये इतकी अद्भूत होती की ती पाहून लोकांना विश्वासच बसेनासा झाला.

एवढं जड वजन डोक्यावर घेऊन सायकल चालवणं सोपं नाही, उलट ते धोकादायकही ठरू शकतं. पण या तरुणाने ज्या आत्मविश्वासाने आणि एकाग्रतेने आपल्या कौशल्याने हा स्टंट साध्य करुन दाखवला, त्यामुळे पाहणाऱ्यांची मनं जिंकली आहेत.

हा व्हिडिओ @sidhu___103 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर झाल्यापासून तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत असून वेगाने पसरतोय, आणि अनेकांनी तरुणाच्या धाडसाला आणि भक्तीला सलाम करत यावर आपापल्या प्रतिक्रिया कमेंट्समधून नोंदवल्या आहेत. एका युजरने लिहिलं, "देवीचीच कृपा जणू", तर दुसऱ्या युजरने, "हे खरंच खूप कठीण आहे" अशी प्रतिक्रिया दिली. आणखी एका युजरने कमेंट केली, "करत तो होता पण मूर्ती पडतेय की काय याची भिती मला वाटत होती".

तरुणाच्या या धाडसी आणि भक्तीभावाने भरलेल्या स्टंटला नेटकऱ्यांनी सलाम केला आहे. व्हिडिओतल्या त्याच्या एकाग्रतेमुळे आणि सायकल चालवतानाच्या कौशल्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर सतत शेअर होत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ