मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

गडचांदूरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा. डॉ. कार्तिक शिंदे यांना "बेस्ट रिसर्चर अवाँर्ड इन फिजिक्स"

गडचांदूरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा. डॉ. कार्तिक शिंदे यांना "बेस्ट रिसर्चर अवाँर्ड इन फिजिक्स" छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शिक्षण PT24 टीम

भद्रावतीच्या नीळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्रा. डॉ. कार्तिक नीळकंठराव शिंदे यांचा गडचांदूर येथील परिषदेत गौरव झाला.

गडचांदूर (जि. चंद्रपूर) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भद्रावतीचे प्रा. डॉ. कार्तिक नीळकंठराव शिंदे यांना "बेस्ट रिसर्चर अवाँर्ड इन फिजिक्स" हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला. डॉ. शिंदे नीळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागात शिकवतात. ते भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे सचिवही आहेत.

रिसर्च इनोव्हेशन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी २०२६ या नावाची ही परिषद गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाने चालवलेल्या महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाच्या रसायन शास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने आयोजित केली होती. महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, केमिस्ट्री टिसर्च असोसिएशन, मुंबई आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड सिमेंट वर्क्स युनिट यांनी मिळून तिचे आयोजन केले.

शिक्षण क्षेत्रातील डॉ. शिंदे यांचे मौलिक संशोधन, त्यांचे योगदान, कौशल्य आणि कामामुळे मिळालेला लौकिक यांची दखल घेऊन परिषदेने त्यांना हा सन्मान दिला. याच परिषदेचे अध्यक्षपदही डॉ. शिंदे यांनी भूषविले.

डॉ. शिंदे यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. त्यांच्या ७१ संशोधनपत्रिका देशविदेशातील जर्नल्समध्ये प्रकाशित झाल्या असून त्यांना संदर्भमूल्य मिळाले आहे. रा.तु.म. नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्याकडून ते भौतिकशास्त्र विषयाचे मान्यताप्राप्त मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३ विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी मिळवली आहे. ते लुमिनीसंस सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य आहेत आणि या सोसायटीच्या विदर्भ रिजनचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या नावावर ९ अभिनव पेटंट आहेत. एल. इ. डी. टी. व्हीच्या स्क्रीनबाबत त्यांचे विशेष संशोधन सुरू आहे. ते अनेक सामाजिक संघटनांशी जोडलेले असून शैक्षणिक कामाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम सतत सुरू असते.

या सन्मानाबद्दल डॉ. विवेक शिंदे (अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती), श्रीमती नीलिमाताई शिंदे (विश्वस्त), मा. आमदार सुधाकरराव अडबाले, प्रो. डॉ. ढोबळे (भौतिकशास्त्र विभाग, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर), डॉ. जयंत वानखेडे (विश्वस्त व माजी प्राचार्य), प्रशांत शिंदे, रवींद्र शिंदे (अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर), डॉ. एल. एस. लडके (प्राचार्य, नीळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती) आणि डॉ. सुधीर मोते (प्राचार्य, यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती) यांनी त्यांचे अभिनंदन केले.

परिषदेला देशविदेशातील नामवंत प्राध्यापक आणि संशोधक आले होते. यात प्रा. डॉ. सोनिया कार्बीनियो (न्यू युनिव्हर्सिटी ऑफ लिस्बान, पोर्तुगाल) आणि प्रो. डॉ. रामेश्वर अधिकारी (रसायनशास्त्र विभाग, त्रिभुवन युनिव्हर्सिटी, काठमांडू, नेपाळ) हे परदेशी संशोधक होते. त्यांच्याबरोबर प्रो. डॉ. वासुदेव गुरनुले (गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), प्रा. डॉ. आर. के. शुक्ला (लखनौ विद्यापीठ, लखनौ), प्रो. डॉ. ए. एच. हास्मानी (सरदार पटेल विद्यापीठ, गुजरात), प्रा. डॉ. ज्योती आर्या (जयपूर युनिवर्सिटी, जयपूर) आणि प्रो. डॉ. व्ही.व्ही. गीते (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) उपस्थित होते. गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही हजेरी लावली.

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही परिषद घेतली. ग्रामीण भागातील महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल शिक्षण क्षेत्रात डॉ. देव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

#नागपूर#पढ़ाई#PT24#Education#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ