मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

शिक्षक सहकार संघटनेत आमगावच्या शिक्षकांचा प्रवेश, ठाकूर अध्यक्ष तर मुधोळकर सचिव

शिक्षक सहकार संघटनेत आमगावच्या शिक्षकांचा प्रवेश, ठाकूर अध्यक्ष तर मुधोळकर सचिव छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शिक्षण PT24 टीम

आमगाव येथील सहविचार सभेत अनेक शिक्षकांनी शिक्षक सहकार संघटनेत प्रवेश केला. जयपाल ठाकूर तालुकाध्यक्ष, तर सुरेश मुधोळकर तालुका सचिव झाले.

आमगाव, दि. ०२ : शिक्षक सहकार संघटनेच्या आमगाव तालुका शाखेने शिक्षक भवन, आमगाव येथे सहविचार सभा तथा मंथन सभा घेतली. आदरणीय लक्षणे सर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा उत्साहाच्या वातावरणात पार पडली.

या सभेत आमगाव तालुक्यातील अनेक शिक्षकांनी संघटनेची कामाची पद्धत, पारदर्शकता आणि शिक्षकांच्या हिताची भूमिका यावर विश्वास दाखवत जाहीरपणे संघटनेत प्रवेश केला. या प्रवेशांमुळे तालुक्यात शिक्षक सहकार संघटनेला नवी ऊर्जा आणि संघटनात्मक बळ मिळाले आहे.

संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड सर, नागपूर विभागीय अध्यक्ष रविकुमार अंबुले सर आणि गोंदिया जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम सर यांच्या नेतृत्वावर भरवसा ठेवून जयपाल ठाकूर सर, सुरेश मुधोळकर सर, लक्षणे सर, राम सोनटक्के सर, सोपान पाटील सर, लोथे सर, भिसे सर, वैद्य सर, बागडे सर यांच्यासह अनेक शिक्षकांनी आपल्या समर्थकांसह संघटनेत प्रवेश केला.

संघटनेचे काम वाढवण्यासाठी आणि शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय देण्यासाठी सभेत नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. जयपाल ठाकूर सर यांच्याकडे आमगाव तालुकाध्यक्षपदाची, तर सुरेश मुधोळकर सर यांच्याकडे तालुका सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. संघटनेत आलेल्या इतर शिक्षकांनाही कामकाजात सक्रिय सहभाग घेता यावा, म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या पदांची जबाबदारी देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमगाव तालुक्यात संघटनेचे काम आणखी व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त झाला. तसेच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, सेवाविषयक समस्या आणि न्याय्य हक्क यांच्यासाठी सगळ्यांनी मिळून पाठपुरावा करण्याचेही ठरले.

शिक्षक सहकार संघटना ही फक्त पदांची संघटना नाही, तर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सतत प्रयत्न करणारे आणि प्रशासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करणारे व्यासपीठ आहे, असे यावेळी सांगण्यात आले. शिक्षकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे आणि कामकाजात पारदर्शकता ठेवणे ही संघटनेची मुख्य वैशिष्ट्ये असल्याचेही नमूद करण्यात आले.

नव्या शिक्षकांच्या प्रवेशामुळे आमगाव तालुक्यात संघटनेची ताकद वाढेल आणि शिक्षकांमध्ये एकजूट, विश्वास आणि सहकार्याची भावना अधिक पक्की होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र लढा देण्याची आणि शिक्षकहिताला सर्वाधिक प्राधान्य देण्याची भूमिकाही यावेळी ठळकपणे मांडण्यात आली.

सभेला नागपूर विभागीय अध्यक्ष रविकुमार अंबुले सर, गोंदिया जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम सर, जिल्हा उपाध्यक्ष विवेक बिसेन सर, प्रसिद्धीप्रमुख रोहित हत्तीमारे सर, मार्गदर्शक घनश्याम बिसेन सर, मोरेश बिसेन सर, महेंद्र रहांगडाले सर, सालेकसा तालुकाध्यक्ष ओमप्रकाश घरात सर, गोंदिया तालुकाध्यक्ष योगेश जगणे सर, सालेकसा तालुका सचिव महेंद्र पटले सर, संघटक संदेश पटले सर, जगणे मॅडम, गोरेगाव तालुकाध्यक्ष शेवेंद्र रहांगडाले सर, उपाध्यक्ष सुजित बोरकर सर, चंदू बिसेन सर, गोपाल वैद्य सर, सुभाष पिसे सर, चंद्रकांत थोटे सर, शुभम बोंद्रे सर, चिपडे सर, सरगर सर, पाटील सर, गडबोले सर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षक सहकार परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

#नागपूर#पढ़ाई#PT24#Education#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ