मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

शरद पवार यांची प्रकृती बिघडली, पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

शरद पवार यांची प्रकृती बिघडली, पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कफ आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांनी सर्व आरोग्यविषयक मापदंड स्थिर असल्याचे म्हटले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. पवार यांना कफ आणि अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

सुप्रिया सुळे यांनी 2 नोव्हेंबर 2026 रोजी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, बाबांना कफाचा त्रास झाल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत आणि त्यांचे सर्व आरोग्यविषयक मापदंड स्थिर आहेत, असे सुळे यांनी लिहिले आहे. काळजी आणि शुभेच्छा व्यक्त करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले आहेत. रुबी हॉस्पिटलमध्ये पवार यांच्या विविध चाचण्या केल्या जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. पवार यांना कफ झाला होता, तसेच अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट होण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

शरद पवार यांनी शनिवारी 31 ऑक्टोबर आणि रविवारी 1 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यात माढा तालुक्यातील तुळशी गावाला आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती. तुळशी गावात त्यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला होता. तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या होत्या. या समस्या सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.

आज होणारा पवार यांचा दुष्काळी दौरा मात्र रद्द करण्यात आला होता. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीचे कारण देऊन हा दौरा रद्द करण्यात आला होता. पण पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळेच दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पवार सोलापूरहून पुण्याला आले होते आणि प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दौऱ्याबद्दल शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी माहिती दिली आहे. दिवाळीनंतर शरद पवार करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. काल रात्री बारामती आणि भिगवण परिसरात मोठा पाऊस झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आला, असे पाटील यांनी सांगितले. करमाळ्यात दिवाळीनंतर शरद पवार नक्की पाहणी करतील, असे सांगतानाच पवार यांना भेटूनच आपण करमाळ्याला गेलो होतो आणि दौऱ्याची तयारी करत होतो, असेही पाटील यांनी स्पष्ट केले होते.

#पुणे#सियासत#PT24#Politics#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ