बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन ३० ऑक्टोबरपासून पुन्हा रुळावर, पावसाळी बंदीनंतर सेवा सुरू

नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन ३० ऑक्टोबरपासून पुन्हा रुळावर, पावसाळी बंदीनंतर सेवा सुरू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 शहर डेस्क

सुरक्षेच्या कारणाने जून ते ऑक्टोबर बंद असलेली नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन ३० ऑक्टोबर २०२६ पासून पुन्हा धावणार आहे.

माथेरान हिल स्टेशनवरची नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन ३० ऑक्टोबर २०२६ पासून पुन्हा सुरू होणार आहे. पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणाने जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत नेरळ आणि माथेरान दरम्यानची थेट रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. आता ही सेवा पुन्हा सुरू होत असल्याने नेरळपासून थेट माथेरानपर्यंत, घाटमाथ्यापर्यंत मिनी ट्रेनने जाता येणार आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बच्चे कंपनीला मिनी ट्रेनची मजा पुन्हा लुटता येईल. शिवाय स्थानिकांच्या रोजच्या प्रवासासाठीही ही ट्रेन महत्त्वाची ठरणार आहे.

पावसाळ्यातील या बंदीच्या काळातही माथेरान आणि अमन लॉज दरम्यानची शटल सेवा वेळापत्रकानुसार सुरू असते. ती यापुढेही सुरू राहील.

नेरळ ते माथेरान ट्रेनचे वेळापत्रक असे आहे. डाऊन ट्रेनची पहिली फेरी दररोज सकाळी ८.५० वाजता नेरळहून सुटेल आणि सकाळी ११.३० वाजता माथेरानला पोहोचेल. दुसरी फेरी नेरळहून सकाळी १०.२५ वाजता सुटेल आणि दुपारी १.०५ वाजता माथेरानला पोहोचेल.

माथेरानहून नेरळकडे येणारी अप ट्रेनची पहिली फेरी दररोज दुपारी २.४५ वाजता निघेल आणि सायंकाळी ५.३० वाजता नेरळला पोहोचेल. दुसरी फेरी सायंकाळी ४.०० वाजता माथेरानहून सुटेल आणि सायंकाळी ६.४० वाजता नेरळला येईल.

या गाडीला एकूण ६ डबे असतील. त्यात ३ द्वितीय श्रेणीचे डबे, १ विस्टाडोम डबा आणि द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन असलेले २ डबे यांचा समावेश आहे.

अमन लॉज ते माथेरान शटल सेवा दररोज सहा फेऱ्यांची आहे. अमन लॉजहून सकाळी ८.४५ (माथेरानला ९.०३), सकाळी ९.३५ (९.५३), दुपारी १२.०० (१२.१८), दुपारी २.२५ (२.४३), दुपारी ३.४० (सायंकाळी ३.५८) आणि सायंकाळी ५.४५ (६.०३) अशा या फेऱ्या आहेत. शनिवारी आणि रविवारी दोन अतिरिक्त विशेष फेऱ्या असतील. विशेष-१ अमन लॉजहून सकाळी १०.३० वाजता सुटून माथेरानला १०.४८ वाजता पोहोचेल. विशेष-३ अमन लॉजहून दुपारी १.३५ वाजता सुटून माथेरानला १.५३ वाजता पोहोचेल.

माथेरान ते अमन लॉज शटल सेवाही दररोज सहा फेऱ्यांची आहे. माथेरानहून सकाळी ८.२० (अमन लॉजला ८.३८), सकाळी ९.१० (९.२८), सकाळी ११.३५ (११.५३), दुपारी २.०० (२.१८), दुपारी ३.१५ (३.३३) आणि सायंकाळी ५.२० (५.३८) अशा फेऱ्या आहेत. शनिवारी आणि रविवारी विशेष-२ माथेरानहून १०.०५ वाजता सुटून अमन लॉजला १०.२३ वाजता पोहोचेल, तर विशेष-४ माथेरानहून १३.१० वाजता सुटून अमन लॉजला १३.२८ वाजता पोहोचेल.

#मुंबई#शहर#PT24#Civic#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ