शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

शेतकऱ्यांना दिलासा: पाच हजारांनंतर आता शेत पाणंद रस्त्यांसाठी 116 कोटींचा निधी वितरित

शेतकऱ्यांना दिलासा: पाच हजारांनंतर आता शेत पाणंद रस्त्यांसाठी 116 कोटींचा निधी वितरित छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 मुंबई टीम

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत रोजगार हमी योजनेतून 116 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना गती मिळणार आहे.

यंदा एल निनोमुळे मान्सूनचे गणित बिघडले. जूनचा शेवटचा आठवडा आणि संपूर्ण जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. पण त्यानंतर एल निनोचे सावट अधिक गडद होत गेले आणि पावसाने ओढ दिली. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तिन्ही महिन्यांत पावसाने दडी मारली, त्यामुळे संपूर्ण पावसाळा कोरडा गेला.

पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीलाही पुरेसा पाऊस मिळाला नाही, म्हणून शेतकरी आणखी संकटात सापडले. यंदा शेतीतून उत्पन्नच निघाले नाही, मग जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. अन्नधान्याच्या टंचाईसोबतच जनावरांच्या चाऱ्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.

निराश झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सरकारने काही दिवसांपूर्वीच आगाऊ मदत म्हणून पाच हजार रुपयांची घोषणा केली होती. राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या पैशांमुळे शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत 116 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत या निधीचे वितरण करण्यात आले आहे. या निधीमुळे रखडलेल्या शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना आता गती मिळणार आहे. कुशल अनुदानाअभावी ही कामे रखडली होती, त्यांना 116 कोटींच्या निधीमुळे चालना मिळणार आहे. शेतापर्यंत बारमाही रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.

या कामांमुळे दुष्काळात शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना रोजगार मिळणार आहे. त्यांच्या हाताला स्थानिक पातळीवर, म्हणजे गावातच काम मिळणार आहे. त्यामुळे काही अंशी दुष्काळामुळे होणाऱ्या स्थलांतराला आळा बसू शकतो. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होण्यास या कामांमुळे मदत होणार आहे.

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर सरकारचा भर आहे, अशी माहिती यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी दिली.

#मुंबई#PT24#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ