विधानपरिषदेच्या निकालानंतर मोदींचा काँग्रेसला सवाल: बॅलेट पेपरवर मतदान, काँग्रेसने किती जागा जिंकल्या?
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महाराष्ट्रासह चार राज्यांतील विधानपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून काँग्रेसला डिवचले आहे.
महाराष्ट्रातील 5 विधानपरिषद मतदारसंघ आणि इतर तीन राज्यांतील मतदारसंघ मिळून एकूण 23 मतदारसंघांतील निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात भाजपा महायुतीचे तीन उमेदवार निवडून आले, तर महाविकास आघाडीला दोन जागा जिंकता आल्या. त्यामुळे राज्यातील या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
विशेष म्हणजे, विधानपरिषदेच्या या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे निकालाकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यातच भाजपलाही या विजयातून ईव्हीएमबद्दलच्या आरोपांचे खंडन करण्याची संधी होती. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून काँग्रेसला डिवचले आहे.
देशातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर हा ईव्हीएमचा विजय असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. तसेच "ईव्हीएम हटाओ, देश बचाओ" अशी घोषणा काँग्रेस आणि विरोधकांकडून दिली जाते. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणीही सातत्याने होत आहे.
याच पार्श्वभूमीवर चार राज्यांतील विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर मोदींनी ट्विटरवरून काँग्रेसला लक्ष्य केले. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहार या चार मोठ्या राज्यांतील 28 जागांसाठी विधानपरिषद निवडणूक झाली आणि मतदान बॅलेट पेपरवर झाले, तरी काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा पाहू, असा प्रश्न त्यांनी विचारला. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही हाच सवाल उपस्थित करत काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, निकालांचे आकडे समोर येत आहेत. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार 15 जागांवर एनडीएला आघाडी आहे. काँग्रेसला अद्याप एकही जागा जिंकता आलेली नाही, असे चित्र आहे. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडीने राष्ट्रवादीच्या चिन्हावर दोन जागा जिंकल्या आहेत.
दुसरीकडे, बिहारमध्ये भाजपला फटका बसला आहे. विद्यमान आमदार नवल किशोर यादव यांच्यासह 4 विद्यमान आमदारांचा पराभव झाला. दरभंगा शिक्षक मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाने विजयाचे खाते उघडले.
उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपने शिक्षक विधान परिषदेची जागा गमावली. मागील निवडणुकीत समाजवादी पक्षाने भाजपचा पराभव करून दोन्ही जागा जिंकल्या होत्या आणि यावेळी समाजवादी पक्षाने आपले उमेदवार कायम ठेवले. शिक्षकांच्या जागेवर समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव यांनी भाजपचे प्रमोद कुमार मिश्रा यांचा 4 हजारांहून अधिक प्रथम पसंतीच्या मतांनी पराभव केला.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.