यंग इंडिया मॅरेथॉन : दमट हवामान, चढ-उताराचा रस्ता असूनही लवप्रित सिंग आणि रविना गायकवाड विजेते
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्यस्तरीय स्पर्धेत पुरुष गटात पुण्याचा लवप्रित सिंग, तर महिला गटात नाशिकची रविना गायकवाड पहिली आली.
ॲथलिड्सतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या यंग इंडिया राज्यस्तरीय मॅरेथॉन (Young India Marathon) स्पर्धेत पुरुष गटात पुण्याचा लवप्रित सिंग विजेता ठरला. महिला गटात नाशिकची रविना गायकवाड पहिली आली. या दोघांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि गौरवपदक देऊन सन्मानित करण्यात आले.
ॲथलिड्सची ही दुसरी स्पर्धा होती आणि राज्यभरातून तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध 11 गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत साडेतीन हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. पहाटेच्या वेळीही हवामान दमट होते, तसेच रस्त्यात चढ-उतार आणि वळणे होती. त्यामुळे धावपटू कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही आघाडीच्या धावपटूंमध्ये अवघ्या काही सेकंदांची चुरस पाहायला मिळाली.
पुरुषांच्या 21 किलोमीटर शर्यतीत लवप्रित सिंगने 1 तास 6 मिनिटे 38 सेकंदांत अंतर पूर्ण करून पहिले स्थान मिळवले. राज तिवारी 1 तास 7 मिनिटे 16 सेकंदांच्या वेळेसह दुसरा आला. दिनकर महाले यांनी 1 तास 8 मिनिटे 40 सेकंदांची वेळ नोंदवून तिसरे स्थान मिळवले.
महिलांच्या गटात राष्ट्रीय धावपटू रविना गायकवाड आणि अमृता पटेल यांच्यात शेवटपर्यंत चुरस होती. रविनाने 21 किलोमीटरचे अंतर 1 तास 29 मिनिटे 25 सेकंदांत पूर्ण करून विजेतेपद पटकावले. अमृता पटेलची वेळ 1 तास 29 मिनिटे 38 सेकंद अशी नोंदली गेली आणि ती दुसरी आली. तेजस्विनी लंबकर्णे हिने 1 तास 30 मिनिटे 15 सेकंदांत शर्यत संपवून तिसरा क्रमांक मिळवला.
आता 10 किलोमीटर गटांचा निकाल. राज्यस्तरीय 10 किलोमीटर शर्यतीत पुरुष गटात स्वराज एस याने 30 मिनिटे 42.7 सेकंदांची वेळ नोंदवून पहिले स्थान मिळवले. अनिल जाधव (31:08.9) दुसरा आला, तर अजय पाल (31:08.18) तिसरा आला. महिलांच्या 10 किलोमीटर गटात साक्षी पवार 38:45.05 वेळेसह पहिली आली. प्रियांका ओक्सा (40:30.05) दुसरी, तर कोमल खांडेकर (41:24.9) तिसरी आली.
19 वर्षांखालील गटाचा निकाल असा लागला. मुलांच्या 10 किलोमीटर गटात गोविंद पाडेकर (31:39.09) पहिला आला. तेजस सपकाळे (32:49.02) दुसरा, तर जय बोऱ्हाडे (33:10.08) तिसरा आला. मुलींच्या गटात खुशी सिंग हिने 39:39.09 वेळेसह पहिले स्थान मिळवले. अंजली पंडित (41:41.05) दुसरी, तर वर्षा पाटील (45:01.04) तिसरी आली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.