सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
16:54 IST

जाहिरात लोड होताच हेरगिरी सुरू, डिस्कव्हर-टेकबद्दल संशोधकांचा अहवाल

सिटिझन लॅब आणि कॉन्फिएंट यांनी स्वतंत्र अहवालात इस्रायली कंपनी डिस्कव्हर-टेकच्या जाहिरातींमधून हेरगिरी झाल्याचे समोर आणले आहे.

जाहिरात लोड होताच हेरगिरी सुरू, डिस्कव्हर-टेकबद्दल संशोधकांचा अहवाल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

आपण रोज वेबसाइट्स आणि मोबाईल ॲप्स वापरतो, तेव्हा समोर येणाऱ्या साध्या जाहिराती हेरगिरीचे हत्यार बनल्याचे आता उघड झाले आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या गोपनीयतेवर पुन्हा एकदा मोठा घाला पडला आहे.

कॅनडातील सायबर संशोधन गट सिटिझन लॅब (Citizen Lab) आणि न्यू यॉर्कमधील जाहिरात सुरक्षा कंपनी कॉन्फिएंट (Confiant) यांनी गुरुवारी वेगवेगळे अहवाल प्रसिद्ध केले. या अहवालांमधून इस्रायली डिजिटल जाहिरात कंपनी डिस्कव्हर-टेक (Discover-Tech) हिचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा प्रकार समोर आला आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, डिस्कव्हर-टेकने गूगल (Google), कॉमकास्ट (Comcast) आणि रशियाची यांडेक्स (Yandex) अशा मोठ्या टेक कंपन्यांच्या जाहिरात नेटवर्कचा गैरवापर केला. त्यातून एक लाख वीस हजारांहून जास्त वेबसाइट्स आणि 75 हजार मोबाईल ॲप्सवर कंपनीने स्वतःच्या जाहिराती पोहोचवल्या. या जाहिरातींमध्ये मोबाईल, इअरबड्स आणि रोजच्या वापरातल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश होता आणि त्या दिसायला आकर्षक होत्या.

मात्र या जाहिराती फक्त दाखवण्यासाठी नव्हत्या. वापरकर्त्यांचे डिजिटल लोकेशन, आयपी ॲड्रेस आणि खाजगी ओळख यांचा माग काढण्यासाठी त्या तयार केल्या होत्या, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

या हल्ल्याची सगळ्यात भीतीदायक बाब म्हणजे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची गरजच नव्हती. तंत्रज्ञानाच्या भाषेत याला झिरो-क्लिक (Zero-click) किंवा ॲडफेक्शन (AdFection) हल्ला म्हणतात. वापरकर्त्याने एखादी वेबसाइट किंवा ॲप उघडले आणि स्क्रीनवर ही जाहिरात फक्त लोड झाली, तरी मागच्या बाजूला (Background) डेटा गोळा करण्याची आणि हेरगिरीची प्रक्रिया आपोआप सुरू व्हायची. काही प्रकरणांत वापरकर्त्यांचे फोन नंबर मिळवण्याचे आणि त्यांच्या डिव्हाइसमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्नही झाले.

या जाहिरात नेटवर्कचा थेट संबंध कॅंडिरू (Candiru) या इस्रायली स्पायवेअर बनवणाऱ्या वादग्रस्त कंपनीशी जोडला गेला आहे. अमेरिकेने 2021 मध्येच कॅंडिरूवर निर्बंध लादले होते.

सिटिझन लॅबने दिलेल्या माहितीनुसार, 2024 ते 2025 या काळात कतारची प्रसिद्ध वृत्तवाहिनी अल जझीरा (Al Jazeera) हिच्या तब्बल 45 विंडोज संगणकांमध्ये डिस्कव्हर-टेकच्या जाहिरातींमधूनच कॅंडिरूचे स्पायवेअर सोडले गेले होते.

हे प्रकरण समोर आल्यानंतर गूगल आणि इतर प्रमुख जाहिरात नेटवर्क प्लॅटफॉर्म्सनी डिस्कव्हर-टेकवर बंदी घालण्याची कारवाई सुरू केली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ