शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:13 IST

फॉक्सवॅगनची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'आयडी टिगुआन' सादर, 600 किलोमीटर रेंजचा कंपनीचा दावा

ऑटोमोबाइल क्षेत्रातील दिग्गज कंपनी फॉक्सवॅगनने युरोपियन बाजारासाठी नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'आयडी टिगुआन' सादर केली आहे. दोन बॅटरी पॅकचे पर्याय आणि ट्रिपल-स्क्रीन केबिन ही तिची खास वैशिष्ट्ये आहेत.

फॉक्सवॅगनची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'आयडी टिगुआन' सादर, 600 किलोमीटर रेंजचा कंपनीचा दावा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ऑटोमोबाइल क्षेत्रातील दिग्गज कंपनी फॉक्सवॅगन (Volkswagen) हिने युरोपियन बाजारासाठी नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'आयडी टिगुआन' (ID Tiguan) सादर केली आहे. कंपनीच्या लोकप्रिय 'ID.4' आणि 'ID.5' या मॉडेल्सची नेक्स्ट जनरेशन म्हणून या गाडीकडे पाहिले जात आहे. ही गाडी 2027 पर्यंत जागतिक बाजारात अधिकृतपणे दाखल होईल.

या एसयूव्हीची रचना कंपनीच्या 'Pure Positive' डिझाईन भाषेवर आधारित आहे. क्रॉसओवरऐवजी तिला अस्सल एसयूव्हीचे रूप देण्यात आले आहे.

आता बॅटरीबद्दल पाहू. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये दोन बॅटरी पॅकचे पर्याय देण्यात आले आहेत. एक 58kWh क्षमतेचा आणि दुसरा 77kWh क्षमतेचा. लहान बॅटरी पॅक रियर-माउंटेड मोटरसह 190 एचपी पॉवर देतो. मोठा 77kWh पॅक रियर-व्हील ड्राइव्ह (RWD) वर 286 एचपी, तर ऑल-व्हील ड्राईव्ह (AWD) लेआऊटवर 299 एचपी पॉवर निर्माण करतो.

कंपनीच्या दाव्यानुसार, ही मोटार एकाच चार्जवर 600 किलोमीटरपर्यंतची WLTP रेंज देते. याशिवाय 2 टनांपर्यंतची टोईंग क्षमताही या गाडीला मिळते.

एसयूव्हीच्या बाहेरच्या भागात एलईडी हेडलाईट, कनेक्टेड एलईडी डीआरएल आणि ब्लॅक ट्रिमसह येणारा इल्यूमिनेटेड लोगो दिला आहे. फ्रंट बंपरच्या कडांवर एअर कर्टन्स, खाली फॉग लॅम्प्स आणि एरो-ऑप्टिमाईज्ड अलॉय व्हील्स असल्याने गाडीला अधिक स्पोर्टी रूप मिळते. मागच्या भागात रॅपअराऊंड एलईडी टेल-लॅम्प आहेत. तसेच 534 लिटरची बूट स्पेस आणि 32 लिटरची फ्रंट ट्रंक स्पेस देण्यात आली आहे.

गाडीच्या केबिनमध्ये सिल्वर अॅक्सेंटसह ऑल-ब्लॅक थीम दिसते. मुख्य आकर्षण म्हणजे ट्रिपल-स्क्रीन सेटअप आहे. त्यात 15 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 10 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 12 इंच पॅसेंजर स्क्रीन यांचा समावेश आहे.

प्रवाशांच्या आरामासाठी एसयूव्हीमध्ये अॅडास (ADAS) सुरक्षा सुट, मेमरी, मसाज आणि व्हेंटिलेशन फीचर्स असलेल्या पावर्ड फ्रंट सीट्स, हरमन कार्डन साऊंड सिस्टम, पॅनोरमिक सनरुफ आणि व्हीकल-टू-लोड (V2L) कार्यक्षमता देण्यात आली आहे.

चार्जिंगच्या बाबतीत ग्राहकांच्या सोयीसाठी आधुनिक चार्जिंग टेक्नोलॉजीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीने फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला असून त्यामुळे बॅटरी कमी वेळेत चार्ज होण्यास मदत होईल. 'व्हेकल-टू-लोड' (V2L) या फीचरमुळे प्रवासी इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गॅजेट्सही सहज चार्ज करू शकतील. आकर्षक डिझाईन, अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स आणि दमदार मायलेजमुळे ही एसयूव्ही इलेक्ट्रिक वाहन बाजारात एक नवा पर्याय ठरत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ