बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:07 IST

चंद्रपूरच्या रय्यतवारी कॉलरीत घरातून गोमांस विक्री उघड, पोलिसांच्या छाप्यात तीन जनावरे सुखरूप

रामनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे घरावर छापा टाकून बेकायदेशीर गोमांस विक्री पकडली, दोन गायी आणि एक गोऱ्हा वाचवला.

चंद्रपूरच्या रय्यतवारी कॉलरीत घरातून गोमांस विक्री उघड, पोलिसांच्या छाप्यात तीन जनावरे सुखरूप छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर शहरातील रय्यतवारी कॉलरी भागात एका घरातून बेकायदेशीरपणे गोमांस विकले जात असल्याचे रामनगर पोलिसांच्या धाडीत समोर आले आहे. या कारवाईत पोलिसांनी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तीन मुक्या जनावरांची सुखरूप सुटका केली.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या आदेशावरून ही मोहीम राबवण्यात आली. घटनास्थळावरून गोमांस, विक्रीचे साहित्य आणि जनावरे असा एकूण ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.

चंद्रपूर शहर परिसरात गोवंशाची अवैध कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी प्रभावती एकुरके यांना दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना अशा अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश दिले होते.

गुप्त माहिती गोळा करताना पोलिसांना खबर मिळाली की रय्यतवारी कॉलरीतील डिस्पेन्सरी चौकात राहणारा अब्दुल गणी शेख ईस्माईल कुरेशी (वय ४९) याने आपल्या घरात कत्तलीसाठी गोवंश बेकायदेशीरपणे डांबून ठेवले असून तो घरातूनच गोमांस विकत आहे.

माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस पथकाने कारवाईचे नियोजन केले. १८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पंचांसमक्ष संशयित आरोपी अब्दुल गणी कुरेशी याच्या घरावर अचानक छापा टाकला. घराची झडती घेतली असता आत गोमांस, वजनकाटा, मांस तोडण्यासाठीचा सत्तूर आणि लाकडी कुंडा असे साहित्य सापडले. याशिवाय कत्तलीसाठी बांधून ठेवलेली तीन जनावरे - दोन गायी आणि एक गोऱ्हा - पोलिसांना सुखरूप मिळाली.

पोलिसांनी सर्व साहित्य आणि जनावरांसह एकूण ९३,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करत तीनही मुक्या जनावरांची सुटका केली. या प्रकरणी आरोपी अब्दुल गणी कुरेशी याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे आणि पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनीषा मोरे, पंकज ठोंबरे, संदीप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे, सुरज शेडमाके आणि ब्युटी साखरे यांनी या कारवाईत महत्त्वाची कामगिरी बजावली.

शहरात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांविरुद्ध अशीच कडक मोहीम पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ