मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:27 IST

केस गळून पातळ झालेत? खोबरेल तेल, मेथी दाणे आणि कढीपत्ता वापरून घरीच बनवा DIY हेअर ऑइल

केसांची काळजी घ्यायची असेल तर घरगुती पदार्थांपासून बनवलेलं तेल फायद्याचं ठरतं. हे तेल कसं बनवायचं आणि कसं वापरायचं ते जाणून घ्या.

केस गळून पातळ झालेत? खोबरेल तेल, मेथी दाणे आणि कढीपत्ता वापरून घरीच बनवा DIY हेअर ऑइल
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

सतत बदलणाऱ्या हवामानाचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. त्यात हेअर केअर रुटीन वारंवार बदलणं, कामाचा ताण आणि केमिकल प्रॉडक्ट्सचा अतिवापर यामुळे केसांची गुणवत्ता आणखी खालावते. त्यामुळे केसांची काळजी घेताना योग्य हेअर केअर फॉलो करणं फार आवश्यक असतं. केस गळणं, कोंडा होणं आणि टाळूवर इन्फेक्शन वाढणं अशा तक्रारी सुरू झाल्या की महिला वेगवेगळे उपाय करून पाहतात. पण त्यासाठी वारंवार केल्या जाणाऱ्या केमिकल ट्रीटमेंटमुळे केस उलट जास्तच कोरडे आणि निस्तेज होतात.

यावर उपाय म्हणून घरगुती पदार्थांपासून बनवलेलं तेल वापरणं फायद्याचं ठरतं. असं तेल नियमित लावल्यास केसांची गुणवत्ता सुधारते आणि केस घनदाट, मजबूत होण्यास मदत होते. हे तेल घरच्या घरी कसं तयार करायचं आणि कसं वापरायचं ते सविस्तर पाहूया.

हे तेल बनवण्यासाठी फक्त तीन जिन्नस लागतात, खोबरेल तेल, मेथी दाणे आणि कढीपत्ता. हे सगळे जिन्नस सहज घरात उपलब्ध असतात, त्यामुळे हे तेल तयार करणं अवघड नाही. सर्वप्रथम एका टोपात खोबरेल तेल घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवावं. तेल गरम झाल्यावर त्यात मेथी दाणे आणि मूठभर कढीपत्ता घालून मंद आचेवर व्यवस्थित शिजू द्यावं. कढीपत्त्याच्या पानांचा रंग पूर्णपणे बदलला की गॅस बंद करावा. तेल कोमट झाल्यावर ते गाळून घ्यावं. अशा पद्धतीने हे आयुर्वेदिक तेल तयार होतं.

हे तयार तेल आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांच्या मुळापासून टोकापर्यंत सगळीकडे लावून हलक्या हाताने मसाज करावं. मसाजमुळे केसांच्या मुळांमधील रक्तभिसरण सुधारायला मदत होते. शॅम्पू करण्याच्या आदल्या दिवशी हे तेल लावून पाच मिनिटं हलक्या हाताने मसाज करावा, त्यानंतर केसांची वेणी बांधून झोपावं आणि सकाळी शॅम्पूने केस स्वच्छ धुवावेत. या पद्धतीने तेल लावल्यास ते केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतं.

असं तयार केलेलं तेल दोन ते तीन आठवडे व्यवस्थित टिकतं, त्यामुळे एकदा तेल बनवलं की ते लगेच संपवण्याची घाई करावी लागत नाही. मेथी दाणे केसांच्या मुळांना खोलवर पोषण देण्यासाठी फायदेशीर असतात. त्यातील पोषक घटकांमुळे टाळूवरचं इन्फेक्शन कमी होतं आणि स्कल्प स्वच्छ राहायला मदत होते. कढीपत्ता फक्त जेवणासाठीच नाही तर केसांसाठीही उपयुक्त ठरतो. त्यात असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे केसांचा काळा रंग टिकून राहतो आणि नवीन केस उगवण्यासही मदत होते.

हा लेख केवळ सर्वसाधारण माहितीसाठी असून यामध्ये कोणत्याही उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ