बँक ऑफ बडोदामध्ये आयटी विभागातील चार वरिष्ठ पदांसाठी भरती, १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बँक ऑफ बडोदाने आयटी विभागातील चार वरिष्ठ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही नियमित नोकरी नसून कराराची भरती आहे.
सरकारी बँकेत काम करायचं स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी बँक ऑफ बडोदाने नवी भरती जाहीर केली आहे. मात्र ही भरती नेहमीच्या लिपिक किंवा प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी नाही. बँकेच्या आयटी विभागातील वरिष्ठ पदं भरण्यासाठी ही जाहिरात निघाली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग आणि टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट या क्षेत्रांत अनुभवी प्रोफेशनल्स हवेत, असं बँकेचं म्हणणं आहे. या पदांवर निवड झालेल्यांची नेमणूक सुरुवातीला तीन वर्षांच्या करारावर होईल. उत्तम परफॉर्मन्स आणि बँकेची गरज लक्षात घेऊन हा करार पुढे वाढवला जाऊ शकतो.
एकूण चार पदांसाठी भरती होणार आहे. पहिलं पद डिप्टी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (Dy. CTO) हे असून त्यात बँकेच्या तांत्रिक सिस्टीम, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आयटी धोरणाशी संबंधित कामांची जबाबदारी असेल. दुसरं पद हेड AI चं आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगचं तंत्रज्ञान बँकिंग सेवांमध्ये वापरण्याचं काम असेल. तिसरं पद डिप्टी हेड क्लाउड CoE चं असून, क्लाउड कॉम्प्युटिंगशी संबंधित सिस्टीम आणि तांत्रिक पायाभूत सुविधा सांभाळाव्या लागतील. चौथ्या पदावर, म्हणजे डिप्टी हेड प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंगवर, बँकेचे डिजिटल प्लॅटफॉर्म आणि इंजिनिअरिंग सिस्टीम विकसित करणं व त्यांचं व्यवस्थापन करणं ही जबाबदारी असेल.
पात्रतेच्या अटी पदानुसार वेगळ्या आहेत. डिप्टी CTO साठी संबंधित इंजिनिअरिंग विषयातील BE/BTech किंवा MCA ची डिग्री लागेल. शिवाय किमान १५ वर्षांचा संबंधित अनुभव आणि वरिष्ठ व्यवस्थापन पातळीवरील किमान ३ वर्षांचा अनुभव हवा. हेड AI साठी कॉम्प्युटर सायन्स, आयटी किंवा संबंधित विषयात BE/BTech किंवा MCA ची डिग्री हवी. एकूण १२ वर्षांचा अनुभव आणि त्यातले किमान ६ वर्षं AI, NLP व कंटेंट अनालिसिसमधले असावेत.
डिप्टी हेड क्लाउडसाठी संबंधित इंजिनिअरिंग विषयात BE/BTech किंवा MCA ची डिग्री आणि किमान १० वर्षांचा अनुभव लागेल, त्यातील ५ वर्षं क्लाउड कॉम्प्युटिंगमधली असली पाहिजेत. डिप्टी हेड प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंगसाठी संबंधित विषयातील BE/BTech किंवा MCA ची डिग्री आणि किमान १० वर्षांचा तांत्रिक अनुभव आवश्यक आहे.
ही नेहमीची सरकारी बँकेची नोकरी नाही, तर ठराविक काळासाठीची कंत्राटी भरती आहे, हे उमेदवारांनी लक्षात ठेवावं. बँकेच्या नियमांनुसार कराराचा जास्तीत जास्त कालावधी पाच वर्षांपर्यंत असू शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सगळ्या अटी आणि शर्ती नीट वाचून घेणं फायद्याचं ठरेल.
इच्छुक उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. आधी वेबसाइट उघडा, मग 'Careers' सेक्सनमध्ये जाऊन 'Current Opportunities' वर क्लिक करा आणि जाहिरात क्रमांक ADVT/2026/18 निवडा. त्या पदाची पात्रता आणि अटी काळजीपूर्वक वाचल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंट किंवा डिजिटल प्रत जपून ठेवा.
ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२६ आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.