गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
28 ऑक्ट | 14:20  येवई जलाशयाचे काम पूर्ण; मुंबई, ठाण्यातील नागरिकांनी सात दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे 28 ऑक्ट | 10:40  प्रदीप पुर्णेकर हत्येच्या निषेधात घोडबंदर रोडवर रात्रभर रास्ता रोको, प्रवासी अडकले 28 ऑक्ट | 02:20  दिंडोशीत बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल; वन विभागाचे रहिवाशांना घाबरू नका, शांत राहा असे आवाहन 28 ऑक्ट | 22:10  ठाण्यात बंदी असलेल्या प्लास्टिकवर कारवाई; महापालिकेने वसूल केला ६९,१०० रुपये दंड 28 ऑक्ट | 06:53  मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकवर 1 नोव्हेंबरपासून माल वाहतुकीच्या गाड्यांना कायमची बंदी 28 ऑक्ट | 22:22  मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी ३३,००० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर
सर्व थेट अपडेट

मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी झिशान सिद्दिकी; कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळेंचा राजीनामा

मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी झिशान सिद्दिकी; कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळेंचा राजीनामा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 राजकारण डेस्क

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दिकी यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी पदाचा राजीनामा दिला.

राज्यात विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी झिशान सिद्दिकी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या पुढाकाराने सिद्दिकी यांची या पदावर वर्णी लागली आहे. या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दुसरीकडे, मुंबई अध्यक्षपदाच्या या निवडीवरून पक्षात नाराजी असल्याचं समोर आलं आहे. सिद्दिकी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी राजीनामा दिला. फेसबुक पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली. मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी या निवडीच्या विरोधात लवकरच पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेणार असल्याचंही कांबळे यांनी सांगितलं.

आपल्या पोस्टमध्ये कांबळे यांनी "साथ सुटली दादांची, पण विचार अजून जिवंत आहे, पद सोडले जरी, तरी निष्ठेचा दिवा अखंड तेवत आहे," असं म्हटलं आहे. पक्षाच्या स्थापनेपासून अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 27 वर्षे काम करता आलं, असं त्यांनी लिहिलं. या प्रदीर्घ प्रवासात दादांनी एक दलित चेहरा म्हणून आणि सहकारातील आपलं काम पाहून वेळोवेळी ताकद दिली, असं कांबळे यांनी म्हटलं आहे.

कांबळे यांनी पुढे लिहिलं की, दुर्दैवाने 9 महिन्यांपूर्वी दादांचे निधन झालं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने पोरकेपणाची जाणीव होत आहे. दादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनी पक्षाची धुरा अतिशय ताकदीने आणि संयमाने सांभाळत आहेत, असं त्यांनी म्हटलं. त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची भक्कम साथ मिळत आहे, असंही ते म्हणाले. वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आपणही मुंबईत तितक्याच ताकदीने काम करत आहोत, असं कांबळे यांनी नमूद केलं.

मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय नुकताच समोर आला, असं सांगून कांबळे यांनी लिहिलं की, पक्ष चालवताना वहिनींना अनेकदा कठोर आणि मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात, याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. वहिनींनी घेतलेल्या निर्णयाचा आपण मनापासून आदर करतो, असंही त्यांनी म्हटलं. मात्र बऱ्याच विचारांती मुंबई कार्याध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

अजित दादा आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जी जबाबदारी सोपवली होती, ती गेल्या अडीच वर्षांत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि तन, मन, धनाने पार पाडण्याचा प्रयत्न केला, असं कांबळे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. पदावर असो वा नसो, पुढेही पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सुनेत्रा वहिनी आणि सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत राहीन, असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

#मुंबई#सियासत#PT24#Politics#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ