बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
02:40  नागपूर पदवीधर निवडणूक: निकाल बुधवारी सकाळपर्यंत लांबणार, वंजारी कोहलेंच्या पुढे 02:00  नागपुरात भरदुपारी भूकंपाचे धक्के, केंद्रबिंदू जमिनीखाली फक्त ८ किलोमीटरवर 01:00  पदवीधर मतमोजणी: टपाली मतांत काँग्रेसचे वंजारी भाजपच्या कोहळेंपेक्षा १५ मतांनी पुढे 27 ऑक्ट | 23:00  नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर, अमरावती शिक्षकमध्ये शिंदे शिवसेनेचे किरण सरनाईक पुढे 27 ऑक्ट | 18:40  नागपूर पदवीधर मतमोजणी दुसऱ्या दिवसापर्यंत लांबण्याची शक्यता, पहिल्याच दिवशी 34 टपाली मतपत्रिका अवैध 13:25  चांदगावात वाघाच्या पिल्लाची चार वर्षांच्या मुलावर झडप, काकांच्या आरडाओरडीने जीव वाचला
सर्व थेट अपडेट

'मैत्रेया' चित्रपटातील 'तुला पाहते' हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांसमोर, मैत्रीतून फुलणाऱ्या प्रेमाची कहाणी

'मैत्रेया' चित्रपटातील 'तुला पाहते' हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांसमोर, मैत्रीतून फुलणाऱ्या प्रेमाची कहाणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

आगामी मराठी चित्रपट 'मैत्रेया'मधील 'तुला पाहते' हे नवं रोमँटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मैत्रीच्या नात्यात प्रेमाची चाहूल कधी लागते, हे अनेकदा कळतही नाही. त्या नाजूक प्रवासाचं चित्रण या गाण्यातून पाहायला मिळतं.

एकमेकांकडे पाहताना रेंगाळणारी नजर, नकळत निर्माण होणारी ओढ आणि शब्दांशिवाय व्यक्त होणाऱ्या भावना, असे प्रेमाचे हळुवार क्षण या गाण्यात मांडले आहेत. कधी सहज होणारी नजरानजर, कधी एकमेकांकडे पाहून खुलणारं हसू, तर कधी न बोलताच मनातलं सांगणारी नजर, अशा छोट्या छोट्या क्षणांतून प्रेम फुलत जातं, असा अनुभव हे गाणं देतं. कलाकारांमधली सहज केमिस्ट्री आणि हळूहळू खुलत जाणाऱ्या नात्याचे भाव यामुळे गाणं लक्ष वेधून घेतं.

या गाण्याला संगीतकार पंकज पडघण यांनी संगीत दिलं आहे. सायली पंकज आणि शिवम सिंह यांनी ते गायलं आहे. गीतकार गुरू ठाकूर यांच्या शब्दांतून प्रेमाच्या नाजूक भावना समोर येतात. संगीत, शब्द आणि सूर यांचा सुरेख मेळ गाण्यात अनुभवायला मिळतो.

चित्रपटाच्या लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे यांनी गाण्यामागच्या भावना सांगितल्या. त्या म्हणाल्या की, मैत्रीचं नातं कधी प्रेमाच्या दिशेने जाऊ लागतं, हे अनेकदा आपल्याला कळतही नाही. एकमेकांकडे पाहण्याची बदललेली नजर, छोट्या छोट्या गोष्टींतून व्यक्त होणाऱ्या भावना आणि नकळत निर्माण होणारी ओढ यातून प्रेम फुलत जातं.

प्रेमाची हीच हळुवार सुरुवात 'तुला पाहते' या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. या गाण्यातल्या भावना प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील अशाच सुंदर क्षणांची आठवण करून देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

संगीतकार पंकज पडघण यांच्या मते, प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची किंवा भव्य प्रसंगांची गरज नसते. एखादी नजर, निरागस हास्य किंवा एकमेकांच्या सहवासात घालवलेला क्षणही मनातल्या भावना व्यक्त करू शकतो. अशाच न बोलता व्यक्त होणाऱ्या भावना संगीताच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न या गाण्यात करण्यात आला आहे.

चित्रपटाचे निर्माते मनोज खळतकर यांनीही सांगितलं की, 'तुला पाहते' हे गाणं मैत्रीच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची चाहूल देणारं आहे. 'मैत्रेया'मध्ये तरुणाईच्या आयुष्यातील नात्यांचे विविध रंग पाहायला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समर टाईम्स प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या 'मैत्रेया' चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर निर्माते असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत. चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या आयुष्यात फुलणाऱ्या नात्यांची गोष्ट सांगणारा 'मैत्रेया' २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. प्रेमाच्या हळुवार भावनांनी सजलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ