मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिवाळीच्या साफसफाईसाठी बोलावलेल्या कर्मचाऱ्यांवर १२ लाखांचे दागिने लांबवल्याचा आरोप; मालाडमध्ये तिघांना अटक

दिवाळीच्या साफसफाईसाठी बोलावलेल्या कर्मचाऱ्यांवर १२ लाखांचे दागिने लांबवल्याचा आरोप; मालाडमध्ये तिघांना अटक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

मालाड पश्चिम येथील ५२ वर्षीय महिलेच्या घरातून सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी तिघांना अटक केली असून, चोरीचा सर्व माल हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मालाड पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेच्या घरातून सुमारे १२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करायची होती, म्हणून या महिलेने ऑनलाईन ॲपवरून होम क्लिनिंग सर्व्हिस बूक केली होती. घराची साफसफाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनीच संधी साधून हा ऐवज लांबवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही दिवसांत तीन आरोपींना पकडले आणि चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याचे सांगितले.

या महिलेने 'होम ट्रँगल' या ऑनलाईन ॲपवरून होम क्लिनिंग सर्व्हिस बूक केली होती. त्या सर्व्हिसनुसार चार कर्मचारी तिच्या घरी साफसफाईचे काम करण्यासाठी आले होते. काम संपवून ते निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेने बेडरूममधील कपाटात ठेवलेले दागिने तपासले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

कपाटातील ५० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, सोन्याचे बिस्किट आणि ५०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट असा एकूण अंदाजे १२ लाख रुपयांचा ऐवज गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. यानंतर घाबरलेल्या महिलेने लगेच मालाड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अज्ञात चोरांविरोधात चोरीची तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर मालाड पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे होम क्लिनिंगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली. तपासादरम्यान संबंधित आरोपी वारंवार आपले मोबाईल फोन बंद करून वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला.

मालाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमर शिंदे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास वेगाने पुढे नेला. नालासोपारा, वसई आणि पालघर परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर मुख्य आरोपीला बोईसर येथून पकडण्यात आले.

सखोल चौकशीदरम्यान सत्यम राजेश शुक्ला (२६), अनिश ब्रिजभूषण चौरसिया (१८) आणि पवन ओमप्रकाश धीवर उर्फ राहुल गौड (२६) या तिघांनी मिळून हा चोरीचा कट रचल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

त्यांच्याकडून चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मालाड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तांत्रिक तपासाच्या मदतीने अवघ्या काही दिवसांत आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ