मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 317 | Very Poor 20:24 IST

कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी'त तुळजाईचा असुरिकेवर वार, अमरबंध तुटणार

कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेच्या 'चातुर्मास पर्व' भागांत तुळजाई आणि असुरिका यांच्यातील संग्राम निर्णायक वळणावर पोहोचला आहे.

कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी'त तुळजाईचा असुरिकेवर वार, अमरबंध तुटणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कलर्स मराठीवरील लोकप्रिय पौराणिक मालिका 'आई तुळजाभवानी'च्या 'चातुर्मास पर्व' या विशेष भागांत सध्या प्रेक्षकांना जबरदस्त थरारक वळण पाहायला मिळत आहे. आदिशक्तीचा अंश असलेली तुळजाई महिषासूर आणि असुरिका यांच्या असुरी शक्तींचा बिमोड करण्यासाठी आक्रमक भूमिका घेते, आणि तीच सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आश्विन शुद्ध दशमीच्या पवित्र पर्वावर सुरू असलेला हा महासंग्राम मालिकेची कथा एका रंजक शिखरावर घेऊन चालला आहे.

या महायुद्धात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तुळजाई स्वतः महिषासुराच्या छावणीत जाऊन त्याला थेट आव्हान देते. अमरबंधाच्या अभेद्य कवचामुळे असुरिकेवर सुरुवातीला होणारे वार निष्फळ ठरतात, आणि त्यामुळे असुरी टोळीचा फाजील आत्मविश्वास वाढत जातो.

असुरिका आपल्या प्राणांवर अमरबंधाचे अभेद्य कवच असल्याचा अहंकार बाळगते आणि तिचा अंत अशक्य आहे असे सांगते. तेव्हा तुळजाई दिव्य आणि रौद्र रूपात तिला थेट उत्तर देते. ती म्हणते, "मी त्या आदिशक्तीचा अंश आहे, ज्यांच्या लीलेत असुरी मायेचा अंत आहे! आश्विन शुद्ध दशमीला तुझ्या पापांचाही अंत निश्चित आहे!"

हे बोलत असतानाच तुळजाई डोळे मिटते, हातात दैवी धनुष्यबाण प्रगट करते आणि प्रत्यंचा ताणते. अमृताच्या थेंबाच्या प्राशनापासून ते ब्रह्मदेवांच्या वरदानापर्यंत असुरिकेला जे अमरत्व मिळाले आहे, ते भेदण्याचा निर्णय ती घेते. त्यासाठी ती समस्त ब्रह्मांडातील वैश्विक ऊर्जा एकत्र करून महाऊर्जेचा एक गोळा तयार करते. हा दिव्य क्षण अत्यंत अद्भुत आहे.

तुळजाई महाशक्तिशाली बाण सोडते आणि असुरिकेचे डोळे विस्फारतात. अमरबंध तुटताच असे काही घडते, ज्याची कुणालाच कल्पना नसते. असुरिकेच्या अंतासाठी महिषासुराची पत्नी शुंभा हिची बहीण वंचिका हिची साथ मिळते. शुक्राचार्यांनी केलेला अमरबंध विधी निष्प्रभ करण्याचा वंचिकेचा प्रयत्न थरारक आहे. असुरी लीलेवर दैवी लीलेने केलेली मात प्रेक्षकांना वेगळाच रोमांचक अनुभव देणारी ठरते.

असुरिकेचा अंत आणि महिषासुराचा पराभव झाल्यानंतर तुळजापुरात विजयाचा जल्लोष होणार आहे. मात्र त्याच वेळी प्रारब्धाची एक गूढ रचना समोर येते. असुरी शक्तीचा पराभव झाला तरी काळ्या शक्तीचा एक अंश अजूनही देवीची सखी पद्मा हिच्या शरीरात अडकलेला असतो, आणि त्यामुळे पद्माची प्रकृती खालावत चालली आहे.

या नव्या आव्हानावर मात करून तुळजाई पुढे कोणते पाऊल उचलणार, याची उत्सुकता आहे. असुरी शक्तीला कायमचा पायबंद घालण्यासाठी ती बालरूपातून आपल्या मूळ रूपात केव्हा परतणार, हेही पाहावे लागेल. हे जाणून घेण्यासाठी 'आई तुळजाभवानी' ही मालिका दररोज रात्री ८:५० वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही, कुठेही JioHotstar वर पाहता येईल.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ