मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

अभिषेक ठाकूर करंडकासाठी ३ नोव्हेंबरपासून पुण्यात २० संघांची टक्कर

अभिषेक ठाकूर करंडकासाठी ३ नोव्हेंबरपासून पुण्यात २० संघांची टक्कर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
खेळ PT24 टीम

येवलेवाडीतील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या मैदानावर आठवी आंतरक्लब टेन्टी-२० स्पर्धा रंगणार असून विजेत्या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.

अभिषेक ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली आठवी 'अभिषेक ठाकूर करंडक' आंतरक्लब खुल्या गटाची टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा ३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा पुणे क्रिकेट ॲकॅडमी आणि सागर कांबळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे सामने येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या मैदानावर रंगणार आहेत.

या स्पर्धेत मुंबई, रत्नागिरी, पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील मिळून एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. पुण्यातील आजी-माजी रणजीपटूंसह अनेक नामवंत खेळाडूंचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असणार आहे.

स्पर्धेचे संचालक सागर कांबळे आणि नरेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा या स्पर्धेचे आठवे वर्ष आहे. शहरातील क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. यंदा स्पर्धेला संघांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला आहे. सामने साखळी आणि बाद फेरी अशा स्वरूपात खेळवले जाणार आहेत.

गतविजेते गेम चेंजर्स आणि उपविजेते व्ही-एड्ज यांच्यासह मुंडे स्पोर्ट्स (मुंबई), एडी स्पोर्ट्स (रत्नागिरी), नॉक-९९, एनबीसी, युनायटेड स्पोर्ट्स क्लब, एबी क्रिकेट क्लब, एमईएस क्लब, प्लॅटिनम क्रिकेट ॲकॅडमी, स्केल-अप अ आणि ब, ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स ॲकॅडमी, हेमंत पाटील ॲकॅडमी, मॅव्हरीक्स, शशी पाटील इलेव्हन, ऑल स्टार, ब्रेव्हहार्ट क्लब, गॅलॅक्सी ड्रीमर्स आणि यजमान पुणे क्रिकेट ॲकॅडमी हे संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत.

स्पर्धेसाठी एकूण दोन लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विजेत्या संघाला एक लाख रुपये आणि आकर्षक करंडक दिला जाईल, तर उपविजेत्या संघाला ५० हजार रुपये आणि करंडक देऊन गौरवण्यात येणार आहे.

संघांच्या बक्षिसांशिवाय वैयक्तिक कामगिरीसाठीही विविध पुरस्कारांची तरतूद करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू अशा पुरस्कारांनी गुणवंत खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारासह 'फायटर ऑफ द मॅच' पुरस्कारही दिला जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सांघिक विजेतेपदाबरोबरच वैयक्तिक कामगिरीसाठीही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

#नागपूर#खेल#PT24#Sports#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ